Multibagger Stocks :6 महिन्यात 500 टक्के परतावा, 11 रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल, सध्या शेअर किती रुपयांवर?
शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळतात. एखाद्या दिवशी सेन्सेक्समध्ये वाढ होतेय तर काही दिवशी घसरण पाहायला मिळते. या अस्थिर स्थितीत काही कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलीटेकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या मल्टीबॅगर शेअरनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये 2 टक्के अप्पर सर्किट लागतंय. आज एकीकडे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली असताना एलीटेकॉन इंटरनॅशनलच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं.
एलीटेकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरची किंमत 65.83 रुपये आहे. एका महिन्यापूर्वी याची किंमत 44.39 रुपये होते.म्हणजेच महिन्याभरात 48 टक्के परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. आज या शेअरची किंमत 65.83 रुपये आहे.
एलीटेकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचा शेअर 7 ऑक्टोबरला 33 रुपयांवर होता . आज तो 65.83 रुपयांवर पोहोचला आहे. 6 महिन्यंपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 11 रुपये होती. सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 497 टक्के परतावा मिळाला आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराकडे या कंपनीचे 1 लाखांचे शेअर असतील तर सहा महिन्यात त्याला 5 लाखांचा फायदा झाला असता. तंबाखूशी संबंधित उत्पादनांची निर्मिती ही कंपनी करते. या कंपनीचं बाजारमूल्य 7.97 कोटी रुपये आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनंची उत्पन्न 79-13 कोटी रुपये राहिलंय. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 8.84 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)