अमेरिकेनं भारतीय सौर उत्पादनांवर 126 टक्के टॅरिफ लादलं, वारी एनर्जीज, प्रीमिअर एनर्जीजचे स्टॉक कोसळले, बाजारात काय घडलं?
Donald Trump: अमेरिकेनं भारतीय सौर उत्पादनांवर 126 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं सौर उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
Continues below advertisement

अमेरिकेच्या निर्णयाचा फटका
Continues below advertisement
1/6
भारतीय शेअर बाजारात सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणाऱ्या उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. अमेरिकेनं भारतीय सौर ऊर्जा उत्पादनांवर 126 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं हा परिणाम दिसून आला.
2/6
अमेरिकनं वाणिज्य मंत्रालयानं भारत, इंडोनेशिया आणि लाओस या देशातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा उत्पादनांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा अमेरिकन सौर ऊर्जा उपकरण उत्पादक कंपन्यांना व्हावा, अशी अपेक्षा अमेरिकची आहे.
3/6
वाणिज्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या फॅक्ट शीटानुसार भारतीय सौर ऊर्जा उत्पादक कंपन्यांवर 125.87 टक्के टॅरिफ, इंडोनेशियावर 104.38 टक्के आणि लाओसवर 80.67 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.
4/6
भारतीय शेअर बाजारावर अमेरिकन सौर ऊर्जा उपकरण उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये 11 टक्के, प्रीमिअर एनर्जीजच्या शेअरमध्ये 14.2 टक्के आणि विक्रम सोलारच्या शेअरमध्ये 7.8 टक्के घसरण झाली.
5/6
वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये 315 रुपयांची घसरण होऊन तो 2708.50 रुपयांवर बंद झाला. आज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये वारी एनर्जीजचा शेअर 2570 रुपयांपर्यंत घसरला होता. विक्रम सोलारचा शेअर 10.21 रुपयांनी घसरुन 175.18 रुपयांवर आला. तर, प्रीमिअर एनर्जीजचा शेअर 47.65 रुपयांनी घसरुन 729.40 रुपयांवर आला. तर, आज प्रीमिअरचा शेअर 666.90 रुपयांपर्यंत घसरला होता.
Continues below advertisement
6/6
अमेरिकन वाणिज्य मंत्रालयाच्या डेटानुसार 2025 या वर्षात भारत, इंडोनेशिया आणि लाओस या तीन देशांकडून सौर ऊर्जा उत्पादनांची एकूण 4.5 अब्ज डॉलर्सची आयात त्यांनी केली आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Feb 2026 07:26 PM (IST)