✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रणवीर-दीपिकापासून विराट-अनुष्कापर्यंत या स्टार्सना सेटवरचं झालं प्रेम

एबीपी माझा वेब टीम   |  13 Feb 2021 09:55 PM (IST)
1

अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना: अक्षय आणि ट्विंकलची पहिली भेट इंटरनॅशनल खिलाडी चित्रपटादरम्यान झाली. या चित्रपट निर्मिती दरम्यान दोघेही डेटिंगमध्ये गंभीर झाले. बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर अक्षयने ट्विंकलला प्रपोज केलं. मात्र, तिने नकार दिला. मग अक्षयने एक अट ठेवली की जर ट्विंकलचा चित्रपट 'मेला' फ्लॉप झाला तर तिला त्याच्याशी लग्न करावे लागेल आणि घडलही तसेच. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि 2001 मध्ये दोघांनी लग्न केले.

2

अजय देवगन-काजोल: अजय आणि काजोलची प्रेमकथादेखील फिल्मी आहे. 'हलचल' चित्रपटाच्या शुटींगवेळी हे दोघेही जवळ आले. त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.

3

रणवीर सिंग-दीपिका पादुकोण: रणवीर आणि दीपिकाचे प्रेम प्रकरण गोलियों की रासलीला: रामलीलाच्या सेटवर सुरू झालं. अंग लगा दे या गाण्यात एका चुंबनाने त्यांना इतके जवळ आणले की, कट बोलल्यानंतरही त्यांनी किस करणे थांबवले नाही. मग काय? यानंतर त्यांची डेटिंग सुरू झाली आणि नोव्हेंबर 2018 मध्ये दोघांनी इटलीमधील लेक कोमो येथे लग्न केले.

4

बिपाशा बासू-करणसिंग ग्रोव्हर: टेलिव्हिजन अभिनेता करणसिंग ग्रोव्हरशी बिपाशाची जवळीकता 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर वाढली. या दोघांनीही सिनेमात बरीच लव्हमेकिंग सीन्स दिले आहेत. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं.

5

विराट कोहली-अनुष्का शर्मा: विराट आणि अनुष्काची जोडी बॉलीवूडमधील सर्वात हॅपनिंग जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची पहिल्यांदा एका शैम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान भेट झाली. इथूनच त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. दोघांनीही सार्वजनिकपणे त्यांचं नातं मान्य केले नाही. मात्र, त्यांच्यातील प्रेम लपून राहिले नाही. बरेच वर्ष एकत्र राहिल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये इटलीच्या टस्कनी इथे ते विवाहबंधनात अडकले.

6

बॉलिवूड स्टार्स एकत्र काम करताना तासनतास सोबत घालवतात. या काळात ते कधी एकमेकांना हृदय देऊन बसतात त्यांनाही कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत, जे सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्न करून संसार थाटला. चला व्हॅलेंटाईन डेनिमित्त अशाच काही सेलेब्सवर नजर टाकू..

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • रणवीर-दीपिकापासून विराट-अनुष्कापर्यंत या स्टार्सना सेटवरचं झालं प्रेम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.