नेहा धुपिया ते श्रीदेवीपर्यंत या बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या प्रेग्नेंट
नीना गुप्ता: नीना वेस्ट इंडीयनचा क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्सशी डेट करत होती. याच काळात ती गर्भवती राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव मसाबा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारिका: कमल हासनची पहिली पत्नी सारिकासुद्धा लग्नाआधी आई झाली होती. कमल आणि सारिका लिव इनमध्ये राहत होते आणि यावेळी सारिकाने मुलगी श्रुतीला जन्म दिला. श्रुती दोन वर्षांची झाल्यावर सारिका आणि कमल हासनने लग्न केले.
कल्कि कोचलिनः लग्नाआधीच कल्कीही आई झाली आहे. तिने लग्नाशिवाय आपल्या पहिल्या मुलाला सोफाला जन्म दिला आहे. कल्की या काळात गाए हर्षबर्गला डेट करीत आहे आणि त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
नताशा स्टेनकोविचः डीजे वाले बाबू सारखी सुपरहिट गाणी देणारी आणि नच बलियेची माजी स्पर्धक नताशा लग्नाआधीच गर्भवती राहिली होती. जानेवारी 2020 मध्ये तिने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी आपला साखरपुडा झाल्याचं शेअर केलं होतं, त्यानंतर मे 2020 मध्ये नताशा गर्भवती असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणानंतर दोघांचे लग्न झाले. आता हार्दिक-नताशा अगस्त्या नावाच्या मुलाचे पालक आहेत.
श्रीदेवीः बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवीने 1996 मध्ये बोनी कपूरसोबत प्रेम विवाह केला. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवी आणि बोनी लग्नाआधी एकत्र एकत्र राहू लागले आणि याच काळात श्रीदेवी गर्भवती राहिली. दोघांनी घाईघाईने लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवीचा जन्म झाला.
बॉलिवूडमध्ये लग्नाआधी आई होण्याचा ट्रेंड नवीन नसून खूप जुना आहे. या यादीमध्ये श्रीदेवीपासून नीना गुप्ता, सारिकासह आजच्या जमान्यातील कल्की कोचलिन, नेहा धुपिया, नताशा स्टेनकोविच अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्रींवर एक नजर..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -