लॉकडाऊनमध्ये सारा अली खानचा सिम्पल लूक व्हायरल; पाहा फोटो
(सर्व फोटो : मानव मंगलानी)
सारा अली खान आनंद रॉय यांच्यासोबत चित्रपट अतरंगीमध्ये काम करताना दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत धनुष आणि अक्षय कुमार दिसून येणार आहे.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर सारा अली खान काही दिवसांपूर्वी फिल्म मेकर आनंद एल रॉय यांच्या ऑफिसमध्ये जाताना दिसून आली होती.
घरातून बाहेर पडताना सारा अली खानने पिंक कलरचा ड्रेस वेअर केला होता. तसेच तिने आवर्जुन चेहऱ्यावर मास्कही लावला होता.
यादरम्यान, सारा अली खान पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मंगळवारी सारा अली खान मुंबईतील घरातून बाहेर पडताना दिसून आली.
आता आपण अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. त्यामुळे आता सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीही घराबाहेर पडताना दिसत आहेत.
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला असून सध्या हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.