PHOTO : Mercedes Benz ते Lamborghini... रणवीर सिंहचं कार कलेक्शन
रणवीरने 2019 मध्ये Lamborghini Urus कार खरेदी केली होती. उरुस ही पहिली चार दरवाजे असलेली लॅम्बोर्गिनी कार आहे. रणवीरला रेड उरसमध्ये बर्याचदा स्पॉट केले गेले आहे. ही कारचं इंजिन 3996 सीसी असून त्याची किंमत 3.10 कोटी रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजग्वार एक्सजेएल रणवीरच्या कार कलेक्शनमध्ये आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 99.56 लाख रुपये आहे. याचं इंजिन 296 बीएचपीची पावर देते.
रणवीरकडे मारुती सुझुकी सियाझ देखील आहे. 2014 मध्ये लॉन्च दरम्यान मारुतीने ही कार रणवीरला गिफ्ट केली होती. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.04 लाख रुपयेपासून सुरू होते.
लँड क्रूझर प्राडो ही कारदेखील रणवीरकडे आहे. या कारमध्ये 3.0 लीटर डिझेल इंजिन आहे. कार 170 बीएचपीची पॉवर आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.
रेंज रोव्हर वोग रणवीर सिंहच्या कार कलेक्शनमध्ये आहे. सफेद रंगाची ही लक्झरी एसयूव्ही 5.0 लीटर, व्ही 8 इंजिनसह सुसज्ज आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 1.58 कोटी रुपये आहे.
Aston Martin Rapide S रणवीर सिंहकडे असलेली सर्वात महाग कार आहे. यात 6.0-लीटर V12 इंजिन आहे. जे 552 बीएचपी पॉवर आणि 620 एनएम टॉर्क जनरेट करते. कारचं इंटिरिअर हँड मे़ड आहे. या कारची किंमत 3.29 कोटी रुपये आहे.
रणवीर सिंहच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes Benz GLS आहे. या कारची शोरूम किंमत 83 लाख रुपये आहे. यात 3.0 लीटर, व्ही 6 इंजिन आहे जे जास्तीत जास्त 255 बीएचपीची पावर आणि 620 न्यूटन मीटर टॉर्क उत्पन्न करते.
रणवीर सिंह हा बॉलिवूडचा एक अभिनेता आहे जो आपल्या स्टाईलसाठी ओळखला जातो. रणवीर स्वत:ला कुठल्याही पात्रामध्ये बसवतो. त्याने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. रणवीरची फॅन फॉलोविंगही भलीमोठी आहे. रणवीरला महागड्या गाड्यांचीही खूप आवड आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या गॅरेजमध्ये अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. अॅस्टन मार्टिनपासून मारुती सियाझपर्यंत अनेक गाड्या रणवीरकडे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -