✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नवाजुद्दीन सिद्दीकी ते पूजा गोर.. या सेलिब्रिंटी जोडप्यांचं 2020 मध्ये झालं ब्रेकअप

एबीपी माझा वेब टीम   |  01 Jan 2021 05:24 PM (IST)
1

2020 वर्ष अनेक बाबतीत वाईट होते. वर्षभरात अनेक संकटांचा नागरिकांना सामना करावा लागला. काही सेलिब्रिटींच्या आयुष्यातही या वर्षी बरीच उलथापालथ झाली. नवाजुद्दीन सिद्दीकी असो वा कोंकणा सेन शर्मा, 2020 मध्ये अनेक स्टार्स आपल्या जीवन साथीदारापासून विभक्त झाले आहेत. चला एक नजर टाकूया.

2

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी : सन 2020 मध्ये नवाजुद्दीन आपल्या विवाहित जीवनामुळे चर्चेत होता. यावर्षी नवाजची पत्नी आलियाने त्याच्यावर आणि त्याच्या भावावर एकामागून एक अत्याचार केल्याचे आरोप केले. इतकेच नव्हे तर नवाजपासून वेगळे होण्यासाठीही आलियाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

3

इरा खान आणि मिशाल कृपलानीः वर्ष 2019 मध्ये संगीतकार मिशाल कृपलानीसोबतचं नातं सर्वाजनिक करणाऱ्याला इरा खानसाठी हे वर्ष चांगले नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार यंदा हे जोडपे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. आजकाल इराचं आपलं फिटनेस प्रशिक्षक नुपूर शिखरे यांच्यासोबत प्रेम प्रकरण चालू असल्याच्या बातम्या येत आहेत.

4

कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शोरे: बॉलिवूडमधील दोन बहु-प्रतिभावान अभिनेते, कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शोरे यांच्यासाठी वर्ष 2020 खूपच निरुपयोगी ठरले आहे. 2010 मध्ये लग्न केलेले हे जोडपे यावर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी अधिकृतपणे एकमेकांकडून घटस्फोट घेतला आहे.

5

पूजा गौर आणि राजसिंग अरोड़ा: बऱ्याच काळापासून एकमेकांशी रिलेशनशीप असलेली पूजा आणि राज यावर्षीही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. या जोडप्याच्या ब्रेकअपविषयी ऐकल्यावर प्रत्येकाला वाटलं की ही केवळ अफवा आहे. मात्र, पूजाने स्वतः या बातमीला दुजोरा दिल्यानंतर लोकांनी यावर विश्वास ठेवला. पूजाच्या म्हणण्यानुसार तिचा आणि राजचा मार्ग विभक्त झाला असला तरी ते चांगले मित्र आहेत.

6

ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी: प्रसिद्ध टीव्ही सीरियल पवित्र रिश्तामध्ये दिसणारे ऋत्विक धनजानी आणि आशा नेगीही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. याला दुजोरा देताना आशाने स्वत: असे सांगितले की आता या दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. वेगळे झालो असलो तरी ऋत्विक धनजानी विषयी काहीह तक्रार नसल्याचे आशाने सांगितले.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • नवाजुद्दीन सिद्दीकी ते पूजा गोर.. या सेलिब्रिंटी जोडप्यांचं 2020 मध्ये झालं ब्रेकअप
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.