Sai Lokur | अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा, लवकरच विवाहबंधनात अडकणार; कोण आहे तिचा जोडीदार?
बिग बॉसनंतर मात्र सई इतर फार कुठे दिसली नाही. पण तिच्या सोशल मीडियावरून ती सातत्याने पोस्ट टाकत होती. त्यातच काही दिवसांपूर्वी तिने एक पोस्ट टाकून आपल्याला जोडीदार मिळाल्याचं सांगितलं होतं. (Photo Credit : @sai.lokur)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून सगळ्यांच्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो सईने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo Credit : @sai.lokur)
आपल्या लग्नाची बातमी काही दिवसांपूर्वी सईने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली होती. सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोत सई आणि तिचा जोडीदार दोघेही पाठमोरे उभे होते. (Photo Credit : @sai.lokur)
बिग बॉसमध्ये मेघा धाडे, उषा नाडकर्णी, अनिल थत्ते, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे आदी मंडळी होती. यात सगळ्यात जास्त ग्लॅमर आपल्याकडे खेचलं ते सईने. (Photo Credit : @sai.lokur)
सई लोकूर ही मूळची बेळगावची. तिने काही मराठी सिनेमात काम केलं. पण तिची चर्चा झाली ती बिग बॉसमध्ये. (Photo Credit : @sai.lokur)
सईने आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सुंदर खळी आहे. म्हणूनच तिने #mydimpledguy असा हॅशटॅग वापरला होता. (Photo Credit : @sai.lokur)
सईने पाठमोरा फोटो शेअर केल्यापासूनच तिचा जोडीदार कोण आहे, यासंदर्भात चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. अखेर सईच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तीर्थदीप रॉय असं आहे. (Photo Credit : @sai.lokur)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -