Balasaheb Thackeray Jayanti : साक्षात बाळासाहेब! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण
ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. (Photo : Twitter ANI)
14 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे.
प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
नऊ फूट उंच व 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिला भव्य पुतळा आहे. (Photo Twitter :@AUThackeray)
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे पुतळा उभारण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.(Photo : Twitter ANI)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. (Photo : Twitter ANI)