PHOTO : अयोध्यानगरी नटली, शहरभर भिंतींवर चित्रांद्वारे साकारलं जातंय रामायण
रामायणातील महत्वाची पात्रं भितींवर साकारली जात आहेत.
अशा कमानी जागोजागी स्वागतासाठी लावण्यात आल्या आहेत.
अयोध्याच्या रस्त्यावर रामायण साकारणारे हे कलाकार मुस्लिम आहेत. जवळपास तीस ते पस्तीस मुस्लीम कलाकारांचा हा गट अयोध्येत रामायण साकारण्यात व्यस्त आहे.
अयोध्येच्या रस्त्यारस्त्यावर सध्या अशा पद्धतीने रामायणातल्या कथा साकार केल्या जात आहेत
भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सव्वा लाख लाडूंचा प्रसाद तयार केला जातो आहे.
अयोध्येतल्या रेल्वे बायपास पुलावर अशा पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली आहे.
अयोध्येतल्या एका कार्यशाळेत त्याची जोरदार तयारी सुरू आहे. सगळे आचारी रामनामाचा गजर करत हा प्रसाद बनवत आहे
अयोध्येच्या ऐतिहासिक शरयू घाटावर अशी साफसफाई सुरू आहे. याच घाटावर दीपप्रज्वलन देखील केला जाणार आहे
अयोध्येत राममंदिराचं भूमीपूजन 5 ऑगस्टला होत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी नटली आहे.