PHOTO | जगातील सर्वात लांब हायवे बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब हायवे बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. हिवाळ्यात पूर्व लडाखला संपूर्ण भारताशी जोडणाऱ्या या बोगद्याचं नाव 'अटल टनल' असं ठेवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटल टनल'मुळे हिमाचल प्रदेशचा लाहौल-स्पिति परिसर आणि संपूर्ण लडाख आता देशातील इतर भागांशी 12 महिने जोडला जाणार आहे. कारण रोहतांग-पास येथे हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बंद होतात. ज्यामुळे लाहौल-स्पितिमार्फत लडाखला जाणारा हायवे सहा महिन्यांसाठी बंद होत असेल. परंतु, आता 'अटल टनल'मुळे ही समस्या दूर होणार आहे.
बोगद्यामध्ये 60 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर प्रत्येक 500 मीटरवर आपातकालीन मार्ग आहेत. बोगद्यामुळे मनाली आणि लेह यांच्यातील अंतर कमी होणार असून प्रवासातील एकूण वेळेपेक्षा 4 तासांची बचत होणार आहे.
याआधी खोऱ्यातील गावांचा दरवर्षी जवळपास 6 महिन्यांपर्यंत बर्फवृष्टीमुळे इतर शहरांशी संपर्क तुटत होता. आता 'अटल टनल'मुळे ही समस्या दूर होणार आहे.
'अटल टनल' पूर्ण करण्यासाठी अंदाजे 6 वर्षांहून कमी वेळ लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, जवळपास 10 वर्षांमध्ये 'अटल टनल'चं काम पूर्ण करण्यात आलं.
अटल टनल जगातील सर्वात लांब हायवे बोगदा आहे. हा 9 किलोमीटर लांब बोगदा, मनालीला वर्षभर लाहौल-स्पिति खोऱ्यांशी जोडून ठेवणार आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -