Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे.

Weekly Horoscope 9 To 15 March 2026
1/8
नवीन आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
2/8
तूळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा दुसरा आठवडा स्थिरतेचा असणार आहे. या काळात तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तसेच, अनेक नवीन कार्य करण्यास तुम्ही सक्षम असाल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
3/8
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळीच पूर्ण करता येतील. तुमचा दृष्टीकोण प्रामाणिक राहील.
4/8
धनु राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
5/8
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमची नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. करिअरमध्ये अनेक चढ-उतार येऊ शकतात. तसे, वडिलोत्पार्जित संपत्तीचा तु्म्हाला लाभ मिळेल.
6/8
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा रचनात्मक स्वरुपाचा असणार आहे. या काळात तुमच्यातील कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तसेच, मुलांचं अभ्यासात मन रमेल.
7/8
मीन राशीसाठी नवीन आठवडा लाभाचा असणार आहे. या आठवड्यात शनि देवाचा अस्त होणार आहे. त्यामुळे ग्रहमानाची स्थिती तुमच्या दृष्टीने सकारात्मक असेल. या काळात आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Mar 2026 04:02 PM (IST)