Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा फायद्याचा की तोट्याचा? 6 पैकी 5 राशींना लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 6 To 12 July 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच जुलैचा पहिला आठवडा सुरु होणार आहे.

Weekly Horoscope 6 To 12 July 2026
1/8
ज्योतिष शास्त्रानुसार, 6 ते 12 जुलै 2026 असा हा कालावधी असणार आहे. दरम्यान नवीन महिन्याचा पहिलाच आठवडा आपल्यासाठी नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.
2/8
तूळ रास - तूळ राशीसाठी नवीन आठवडा नशीब पालटणारा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील.
3/8
वृश्चिक रास - वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन आठवडा काहीसा दबावाचा असणार आहे. कामाच्या वाढत्या प्रेशरमुळे तुमच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. या काळात पैशांचे व्यवहार करु नका.
4/8
धनु रास - धनु राशीसाठी जुलैचा पहिला आठवडा सकारात्मक असणार आहे. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, करिअरमध्ये तुम्ही प्रगतीची उंची गाठाल.
5/8
मकर रास - मकर राशीच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी मिळेल.
6/8
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
7/8
मीन रास - मीन राशीच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Jul 2026 10:33 AM (IST)