Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मेचा चौथा आठवडा कसा असणार? कोणत्या 2 राशींना बसणार आर्थिक फटका? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 18 To 24 May 2026 : मे महिन्याचा चौथा आठवडा तूळ ते मीन अशा 6 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
Continues below advertisement

Weekly Horoscope 18 To 24 May 2026
Continues below advertisement
1/8
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 6 ते 12 एप्रिल 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल.
2/8
तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा चौथा आठवडा लाभदायी असणार आहे. या कालावधीत तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त कराल. तसेच, तुमच्या कामात प्रामाणिकपणा दिसून येईल. या कालावधीत कोणतंही काम हाती घेण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
3/8
वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवातच फार प्रभावशाली असणार आहे. या कालावधीत तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. दरम्यान तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. तुमच्या बोलण्याने इतर लोक प्रभावित होतील. सामाजिक ओळखी वाढतील.
4/8
धनु राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करता येतील. तसेच, हाती घेतलेलं कार्य तुम्ही पूर्ण कराल. महत्त्वाच्या योजना राबवण्याची संधी मिळेल. तसेच, मित्रांच्या सहकाऱ्याने तुम्हाला अनेक कामे सहज पूर्ण करता येतील.
5/8
मकर राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुम्हाला नवीन नोकरी शोधायची असेल तर हा काळ चांगला असेल. ग्रहांच्या संक्रममाचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
Continues below advertisement
6/8
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा सावधानतेचा तितकाच प्रगतीचा असणार आहे. या कालावधीत जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. तुम्ही हाती घेतलेलं कार्य पूर्ण होईल. मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय देता येईल. तसेच, नशिबाच्या साथीने तुमची आर्थिक भरभराट होईल. फक्त त्या पैशांचा योग्य वापर करा.
7/8
मीन राशीसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या दरम्यान कोणताही निर्णय घेताना तुम्ही 10 वेळा विचार करा. तसेच, कोणालाही पैसे उधार म्हणून देऊ नका. मित्रांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. करिअरच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. तसेच, प्रेमजीवनातही आनंद टिकून राहील. मात्र, तरीही तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 May 2026 02:28 PM (IST)