Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 'या' 4 राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार; प्रमोशनची संधी कोणत्या राशीला मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 30 March To 5 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिन्याची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर होणार आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 हा कालावधी असेल.
Continues below advertisement

Weekly Horoscope 30 March To 5 April 2026
Continues below advertisement
1/8
हा काळ तूळ ते मीन अशा सहा राशींसाठी नेमका कसा असेल? कोणत्या ग्रहांच्या संक्रमणाचा या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात
2/8
तूळ राशीसाठी आठवड्याची सुरुवात शुभकारक असणार आहे. या कालावधीत मित्र परिवाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, काही महत्त्वाची कामेही पूर्ण कराल. काही संकल्प आखाल. पैशांच्या बाबतीत जपून खर्च करा. विनाकारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये पैसे घालू नका.
3/8
वृश्चिक राशीसाठी एप्रिलचा पहिला आठवडा जबाबदारीचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या वाणीत स्पष्टता ठेवा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन चांगलं रमेल. मानसिक आरोग्य चांगलं असेल.
4/8
धनु राशीसाठी एप्रिलचा पहिलाच आठवडा नवीन गोष्टी शिकण्याचा असणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनातून ब्रेक घेऊन त्याबरोबर नवीन कलात्मक गोष्टी शिकण्याचा आहे. जे कार्य हाती घ्याल त्यावर मनापासून काम कराल. आठवड्याच्या मध्यात करिअरशी संबंधित गोष्टींवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचं नेटवर्किंग चांगलं असेल.
5/8
मकर राशीसाठी नवीन आठवडा सावधानतेचा असणार आहे. या कालाधीत तुमचा वैयक्तिक विकास होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात कुटुंबियांचा देखील हातभार असेल. तसेच, करिअरशी संबंधित तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन गोष्टींचा स्वीकार तुम्ही कराल. धैर्याने काम करणं गरजेचं आहे.
Continues below advertisement
6/8
कुंभ राशीसाठी सुरुवातीचे काही दिवस फार सकारात्मक असतील. तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. त्यामुळे अनेक गोष्टी तुम्ही फार ग्रॅंटेड घ्याल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला साक्षात्कार होईल. मित्रपरिवाराबरोबर संवाद साधणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
7/8
मीन राशीसाठी एप्रिलचा पहिलाच आठवडा भाग्याचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. मात्र, कामाच्या ठिकामी देखील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Mar 2026 01:04 PM (IST)