Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिलचा पहिलाच आठवडा भाग्याचा; नोकरी, पैसा, करिअरमध्ये मिळणार भरघोस यश, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 30 March To 5 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिन्याची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर होणार आहे.
Continues below advertisement

Weekly Horoscope 30 March To 5 April 2026
Continues below advertisement
1/8
30 मार्च ते 5 एप्रिल 2026 हा कालावधी असेल. हा काळ मेष ते कन्या अशा सहा राशींसाठी नेमका कसा असेल? कोणत्या ग्रहांच्या संक्रमणाचा या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
2/8
मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात चांगली असेल. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, एखाद्या गोष्टीत तुमचा मनापासून पुढाकार दिसेल. रचनात्मक, कलात्मक गोष्टी करण्यात तुमचा कल असेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला ध्यान करण्याची गरज आहे. तसेच, शिस्तप्रिय तुमचं आयुष्य असेल.
3/8
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा आरामदायी पण त्याचबरोबर भावनात्मक स्वरुपाचा असणार आहे. या कालावधीत अनेक भावनिक गोष्टी घडतील. जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तुमच्या दिनश्चर्येत थोडासा बदल करणं अपेक्षित आहे. अन्यथा गोष्टी तुमच्यावर येऊ शकतात. तुमच्यासाठी नियमित योग आणि ध्यान लाभदायी ठरेल.
4/8
मिथुन राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या कालावधीत नवीन विचारांची शिदोरी तुमच्याबरोबर असणार आहे. सामाजिक कार्यात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुम्हाला समाधान वाटेल.
5/8
कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, भविष्यासाठी तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या वाणीत सुधारणा होणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्यातील मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करा. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
Continues below advertisement
6/8
सिंह राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चढ-उतारांचा सामना करावा लागेल. काही आव्हानं तुमच्यासमोर उभी राहतील. पैशांची बचत करणं देखील महत्त्वाचं असेल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. नवीन योजनांचा लाभ घ्याल.
7/8
कन्या राशीसाठी सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक असतील. मात्र, जसजसे दिवस सरतील तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल. काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. लग्नाचे प्रस्ताव तुमच्यासाठी येऊ शकतात.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Mar 2026 11:36 AM (IST)