Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी सप्टेंबरचा नवा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 21 To 27 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे.
Continues below advertisement

Weekly Horoscope 21 To 27 September 2026
Continues below advertisement
1/8
नवीन आठवडा 21 ते 27 सप्टेंबर 2026 असा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल.
2/8
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायी असणार आहे. या काळात तुम्हाला छोट्याछोट्या गोष्टींसाठी तडजोड करावी लागणार नाही. तसेच, तुमच्या वागण्यात विनम्रता दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा प्रभाव दिसून येईल.
3/8
वृश्चिक रास - वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा संयमाचा असणार आहे. या काळात तुमच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे. अनेक गोष्टी अशा घडतील जिथे तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाईल. लगेच प्रतिक्रिया देणं टाळा.
4/8
धनु रास - धनु राशीसाठी जुलैचा चौथा आठवडा सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या दिनश्चर्येवर लक्ष केंद्रित करायचं आहे. तसेच, नवीन गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. कोणालाही विनाकारण दुखवू नका.
5/8
मकर रास - मकर राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार जबाबदारीची असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. स्वत:वर विश्वास ठेवा. तसेच, कामाच्या ठिकाणी कोणताच हलगर्जीपणा करु नका.
Continues below advertisement
6/8
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांसाठी जुलैचा चौथा आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तुमच्या हातून सत्कर्म घडेल.
7/8
मीन रास - मीन राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडताना दिसतील. तसेच, तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. शत्रूंपासून सावध राहा. पैशांचा योग्य ठिकाणी वापर करा.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 19 Sep 2026 12:20 PM (IST)