Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी कोणत्या राशींना लागणार लॉटरी? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 16 To 22 March 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्याचा तिसरा आठवडा मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 16 To 22 March 2026
1/8
ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
2/8
मेष राशीसाठी मार्चचा तिसरा आठवडा सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्हाला कोणतंही पाऊल उचलताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या वाणीवर लक्ष केंद्रित करा.
3/8
वृषभ राशीसाठी मार्चचा नवीन आठवडा भरभराटीचा असणार आहे. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल.
4/8
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा मिश्रित फलदायी स्वरुपाचा असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व कायम टिकून राहील. मात्र, या काळात कोणाशीही वादविवाद करु नका.
5/8
कर्क राशीसाठी मार्चचा नवीन आठवडा अत्यंत शुभकारक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नवीन गोष्टींचा लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
6/8
सिंह राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात आत्मचिंतनाची असणार आहे. या कालावधीत तुमच्यात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच, तुमच्या वागणुकीतही थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो.
7/8
कन्या राशीसाठी मार्चचा तिसरा आठवडा चढ-उताराचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ तर मिळेल. मात्र, तरीही तुम्ही समाधान असणार नाहीत. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Mar 2026 11:14 AM (IST)