Surya Grahan 2026 : वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण, भारतात सूतक काळाचा कालावधी नेमका किती तास? वाचा सूर्यग्रहणाशी संबंधित A to Z माहिती
Surya Grahan 2026 : 2026 वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा अधिक प्रभाव लहान मुलं, वृद्ध आणि स्त्रियांवर होतो. जाणून घ्या ग्रहणाची वेळ आणि कशी काळजी घ्यावी.

Surya Grahan 2026
1/10
ज्योतिष शास्त्रात सूर्य ग्रहणाला अशुभ मानलं जातं. या काळात काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते.
2/10
वर्षाचं पहिला सूर्यग्रहण आज 17 फेब्रुवारीला आहे. पंचांगानुसार, आज माघ अमावस्या आहे.
3/10
हे सूर्यग्रहण सायंकाळी 03 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल आणि 5 वाजून 40 मिनिटांनी संपणार आहे.
4/10
ज्योतिष शास्त्रानुसार, आजचं सूर्यग्रहण हा आंशिक आहे. जे पाहायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पूजा पाठ करू शकता.
5/10
सहसा सूर्यग्रहणाच्या परिणाम लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांवर अधिक होतो. त्यामुळे यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
6/10
शास्त्रानुसार हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या सूर्यग्रहणाला भारतात सूतक काळ लागणार नाही.
7/10
ग्रहणाच्या दिवशी स्त्रियांनी शिवणकाम, स्वयंपाक बनवणे, घरातून बाहेर निघणे हे कार्य वर्जित असते. पण यावर्षी अशा कोणत्याही मर्यादा नाहीत.
8/10
या दिवशी लहान मुलांच्या डोळ्यांवर ग्रहणाचा थेट प्रभाव पडतो. म्हणून त्यांना बाहेर पडू देत नाही. पण, या ग्रहणाला ते सामान्य दिवसासारखं बाहेर पडू शकतात.
9/10
वृद्ध लोकांना सुद्धा या ग्रहणाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 Feb 2026 09:54 AM (IST)