Shukra Rahu Dhan Yog 2026 : शुक्र-राहूच्या 'महाशक्तिशाली राजयोगा'चा चमत्कार; 6 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Shukra Rahu Dhan Yog 2026 : द्रिक पंचांगानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

Shukra Rahu Dhan Yog 2026
1/13
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खास मानला जाणार आहे. या महिन्यात मंगळ ग्रह आपल्या मकर राशीत राहून रुचक राजयोग निर्माण करणार आहे.
2/13
तिथे शुक्र ग्रहाच्या स्थितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. शुक्र ग्रहाला ज्योतिष शास्त्रात धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि आकर्षणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शुक्र ग्रहाची जेव्हा चाल बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या आर्थिक जीवनावर पडतो.
3/13
द्रिक पंचांगानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
4/13
पंचांगानुसार, शुक्र ग्रह 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 1 वाजून 15 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहूसह शुक्राची युती 2 मार्च 2026 पर्यंत असणार आहे.
5/13
या राशीत राहू ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि राहूच्या युतीने एक शक्तिशाली धन योग निर्माण होणार आहे.
6/13
या योगाचा सर्व राशींवर परिणाम पाहायला मिळेल. मात्र, तीन राशींसाठी हा काळ फार भाग्यशाली असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
7/13
मेष रास : मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि राहूमुळे जुळून येणारा धन योग अनेक पद्धतीने लाभदायी ठरणार आहे. या योगामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, पैसा कमावण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील.
8/13
या राशीवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. मात्र, या काळात तुमची चांगली कमाई होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.
9/13
वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग शुभकारक ठरणार आहे. तुमच्या भौतिक सुख संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
10/13
शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, नवीन बिझनेस किंवा स्टार्टअप सुरु करण्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.
11/13
कुंभ रास : कुंभ राशीसाठी फेब्रुवारीचा महिना फार खास असणार आहे. या काळात शुक्र आणि राहूच्या युतीमुळे लग्न भावाचा योग जुळून येणार आहे.घरात आनंदाचं वातावरण राहील
12/13
तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीचा देखील तुम्ही चांगला लाभ घ्याल. या कालावधीत नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ काळ आहे.
13/13
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Feb 2026 10:32 AM (IST)