एक्स्प्लोर
Shukra Gochar 2025 : पुढचे 23 दिवस 'या' राशींना सावधानतेचा इशारा; शुक्राच्या संक्रमणामुळे कोसळणार संकटांचा डोंगर, पदोपदी मिळेल इशारा
Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाने आज म्हणजेच 31 मे 2025 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाचं हे संक्रमण सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी होणार आहे.
Shukra Gochar 2025
1/8

शुक्र ग्रहाचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. शुक्र ग्रहामुळे कोणकोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
2/8

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना निष्काळजीपणा करु नका, तसेच, राग आणि अहंकार करु नका. सर्वांशी नम्रतेने वागा. या संक्रमणाच्या काळात क्रोध केल्यामुळे तुमची ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत.
3/8

वृषभ राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. पैशांची गुंतवणूक सध्या करु नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
4/8

कर्क राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. तसेच, अधिक पैसे कमावण्यासाठी तुम्ही असमर्थ व्हाल. तुमच्या खर्चात वाढ निर्माण होऊ शकते.
5/8

कन्या राशीच्या लोकांचं बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकतं. यासाठी तुमच्या व्यवसायात सुधार करण्याची गरज आहे. लोकांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. या काळात कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका.
6/8

वृश्चिक राशीच्या लोकांच्या नातेसंबंधावर या संक्रमणाचा परिणाम होऊ शकतो. लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला फार संघर्ष करावा लागेल. या काळात तुमचा मानसिक तणाव वाढेल.
7/8

शुक्र ग्रहामुळे मकर राशीच्या लोकांचा तणाव जास्त वाढेल. तसेच, कुटुंबात देखील सतत वाद जाणवतील. जोडीदाराबरोबर देखील वाद होऊ शकतात.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 31 May 2025 09:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















