एक्स्प्लोर
Shani Dev: अक्षय्य तृतीयेपूर्वी शनिदेवांचा मोठा गेम!'या' 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू होतोय, प्रत्येक कामात यश मिळेल
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेपूर्वी 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होतोय. एप्रिलमध्ये शनिची मोठी हालचाल पाहायला मिळेल, ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळे परिणाम दिसून येईल.
Shani Dev astrology marathi news Before Akshaya Tritiya Shani Dev changing the constellation golden time of these 3 zodiac signs is beginning
1/8

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव हे कर्मानुसार फळ देतात, म्हणून त्यांना न्यायाधीशही म्हटले जाते. तसं पाहायला गेलं तर ग्रह आणि राशींमध्ये एक विशेष संबंध आहे. नऊ ग्रहांपैकी, शनि ग्रह हा सर्वात संथ गतीने आपली राशी बदलण्यासाठी ओळखला जातो.
2/8

ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाधीश शनि ग्रह देखील नक्षत्र बदलण्यासाठी वेळ घेतो. सध्या शनि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात आहे. वैदिक पंचांगानुसार, अक्षय्य तृतीयेपूर्वी शनि सोमवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 07:52 वाजता उत्तरभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल. 26 व्या नक्षत्रात शनीचे भ्रमण हे 3 राशींचे नशीब पालटू शकते, जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?
3/8

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी, उत्तरभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश शुभ राहील. आत्मविश्वास वाढेल. तो चांगला काळ असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकेल. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परस्पर मतभेद दूर होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
4/8

कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्रातील बदल खूप शुभ राहील. अद्याप पूर्ण न झालेली अनेक कामे लवकरच पूर्ण होऊ शकतात. बिघडलेली कामेही दुरुस्त होतील. मन अधिक प्रसन्न राहील. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नात्यात गोडवा येऊ शकतो. तुम्ही नवीन काम करण्याचा विचार करू शकता. व्यवसायात नफा होऊ शकतो. बाहेर जाण्याचे बेत आखता येतील.
5/8

मकर - मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्रातील बदल खूप शुभ राहील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. व्यवसायात यश मिळू शकेल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. कर्जातून मुक्तता मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
6/8

हिंदू सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीयेचा सण हा 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होतोय. असे म्हटले जाते की, या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचे फळ शाश्वत असते.
7/8

यावेळी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योगायोग घडत आहेत. मात्र त्यापूर्वी शनिदेव नक्षत्र बदलणार असल्याने ज्याचा सकारात्मक परिणाम काही विशेष राशींवर होणार आहे. ज्यामुळे शनिदेव, देवी लक्ष्मी आणि कुबेराची एकत्रित कृपा या राशींवर होणार आहे,
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)
Published at : 18 Apr 2025 08:59 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























