Ram Navami 2025: रामनवमीच्या उत्सवामुळे चैतन्याची लाट; शिर्डी, शेगावमध्ये रामजन्माच्या सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
Ram Navami 2025: आज राम नवमी.. राम जन्माचा हा सोहळा राज्यासह देशभरात साजरा होतोय. शिर्डी, शेगावमध्ये प्रभू राम जन्माच्या सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून येतेय.

Ram Navami 2025 festival brings a wave of spirituality Devotees throng Shirdi Shegaon for Ram janma celebrations marathi news
1/11
राम नवमीनिमित्त शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सव साजरा केला जातो. साई बाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचे 114 वे वर्ष आहे.
2/11
राम नवमीनिमित्त शिर्डी, शेगावमध्ये दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, अनेक भाविक आज दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
3/11
राम नवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डीत आजच्या काकड आरती नंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विणा मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
4/11
आज प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या उत्साहत साजरा करण्यात येत आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात 131 वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे.
5/11
राम नवमीनिमित्त देशभरातून लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून आज सकाळपासूनच मोठ्या आनंदात भाविक संत गजानन महाराज आणि प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेत आहेत.
6/11
जवळपास दीड लाख भाविक सध्या शेगावात असून मंदिर प्रशासनाने सोहळा साजरा करण्यासाठी मोठी तयारी केली आहे.
7/11
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी राम जन्मोत्सव शेगाव येथे साजरा होणार असून दुपारी बारा वाजता प्रमुख सोहळा साजरा होणार आहे.
8/11
image 8
9/11
image 11
10/11
राम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्ताने दर्शनसाठी मोठी गर्दी पाहायला मिळतेय. गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिरात चैत्रोत्सव सुरू झाला आहे. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह दिसतोय.
11/11
नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या गर्दीचा अंदाज बघता चोख व्यवस्था करण्यात आलीय.
Published at : 06 Apr 2025 08:20 AM (IST)