Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाला बहिणीला काळ्या रंगाच्या भेटवस्तू देऊ नका, दोषमुक्ती टाळा, आणखी कोणकोणते गिफ्ट्स टाळावे?
Raksha Bandhan Gifts 2025 : भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधनाचा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा करतात.

Raksha Bandhan Gifts 2025
1/7
बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. मात्र, अशा काही वस्तू आहेत ज्या बहिणीला कधीच देऊ नयेत. या वस्तू देणं अशुभ मानतात.
2/7
यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाणा आहे. या निमित्ताने तुम्हीदेखील तुमच्या बहिणीसाठी छान छान गिफ्ट्सचे पर्याय शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
3/7
रक्षाबंधनाच्या दिवशी अशा अनेक वस्तू आहेत ज्या भावाने बहिणीला देऊ नयेत. यामुळे दोष लागतो तसेच, या वस्तू अशुभ असतात अशी मान्यता आहे.
4/7
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला जुन्या वस्तू देऊ नयेत. रक्षाबंधनाचा दिवस हा फार शुभ असतो त्यामुळे बहिणीमला जुन्या वस्तू देऊ नयेत. त्यापेक्षा अशा भेटवस्तू द्या ज्याने बहिणीचा आनंद वाढेल.
5/7
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काळ्या रंगाचे कपडे भेटवस्तू म्हणून देऊ नका. रक्षाबंधनाचा दिवस फार शुभ असतो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या भेटवस्तू देऊ नका. उदा..काळ्या रंगाचे कपडे, घड्याळ किंवा एखादी भेटवस्तू.
6/7
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला नकली किंवा काचेपासून बनवलेल्या वस्तू देऊ नका. काचेला शुभ मानत नाहीत. त्यामुळे अशा भेटवस्तू देऊ नका.
7/7
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला मोत्याची कोणतीही भेटवस्तू देऊ नये. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मोती हा दु:ख आणि अश्रूंचं प्रतीक मानतात. यासाठीच मोती देणं म्हणजे दु:खाला आमंत्रित करण्यासारखं आहे.
Published at : 07 Aug 2025 02:09 PM (IST)