Mangal Gochar 2026 : मकर संक्रांतीला बदलणार मंगळ ग्रहाची चाल; 16 जानेवारीपासून 'या' राशींच्या हातात खेळणार पैसा
Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रह मकर राशीच्या पंच महापुरुष योगात येण्याने शक्तिशाली रुचक राजयोग निर्माण होणार आहे.

Mangal Gochar 2026
1/12
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला मंगळ ग्रह आपल्या उच्च स्थानी असणार आहे. मंगळ ग्रह मकर राशीत येण्याने पंच महापुरुष योगात येण्याने शक्तिशाली रुचक राजयोग निर्माण होणार आहे.16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी मंगळ ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक असतो. हा रुचक राजयोग 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे.
2/12
मेष रास : मंगळ ग्रह मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे रुचक राजयोगाचा परिणाम या राशीवर दिसणार आहे. या काळात तुमच्या कामकाजात चांगली गती मिळेल.
3/12
विविध क्षेत्रात नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. अनेक दिवसांपासून रखडलेलं तुमचं प्रमोशन तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायिकांच्या हातात नवीन प्रोजेक्ट लागतील.
4/12
कर्क रास : रुचक राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
5/12
धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, हळुहळू तुमच्या कामांना वेग येणार आहे. मुलांचं अभ्यासात मन रमेल. तसेच, तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
6/12
सिंह रास : या योगाच्या प्रभावाने तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगले बदल घडताना दिसतील. नोकरदार वर्गातील लोकांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात येऊ शकतात.
7/12
तसेच, मॅनेजमेंटशी संबंधित तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
8/12
वृश्चिक रास : मंगळ ग्रहाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
9/12
तसेच, एखादी नवीन प्रॉपर्टी देखील घेऊ शकता. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली असेल.
10/12
मकर रास : या राशीच्या मंगळ ग्रह उच्च स्थानी आहे. त्यामुळे रुचक राजयोगाचा सर्वात जास्त लाभ या राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये अनेक मोठे बदल झालेले तुम्हाला दिसतील.
11/12
नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळू शकतं. तसेच, तुमच्या मेहनतीने तुम्ही भविष्यात पुढे जाल. भविष्या संबंधित तुम्ही अनेक योजना राबवाल.
12/12
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 07 Jan 2026 10:55 AM (IST)