Makar Sankranti 2026 : हिंदू सणांमध्ये अशुभ मानला जाणारा काळा रंग, मकर संक्रांतीला शुभ का मानतात? वाचा धार्मिक महत्त्व
Makar Sankranti 2026 : हिंदू धर्म शास्त्रानुसार, कोणत्याही सणांना किंवा पूजेच्या वेळेस काळा रंग अशुभ मानला जातो, पण मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र शुभ मानले जाते

Makar Sankranti 2026
1/9
हिंदू धर्मशास्त्रानुसार, कोणत्याही सणांना किंवा पूजेच्या वेळेस काळा रंग अशुभ मानला जातो. कारण काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे असे मानले जाते. पण, मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र शुभ मानले जाते.
2/9
हिंदू धर्मशास्त्रानुसार, मकर संक्रांतीला विशेष स्थान आहे. या काळात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो.
3/9
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेव मकर संक्रांतीच्या दिवशी शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो.
4/9
विविध भागांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळे सण साजरे होतात. पण त्या सणांमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो, पण मकर संक्रांतीला मात्र हा रंग शुभ का मानला जातो. यामागचं कारण जाणून घेऊयात.
5/9
ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या रंगाचा संबंध शनीसोबत जोडलेला आहे.
6/9
शिवाय मकर संक्रांतीला थंडीचे वातावरण असते, अशा काळात काळे कपडे घातल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. यासाठी परंपरेनुसार मकर संक्रांतीला काळे कपडे घातले जातात.
7/9
त्याशिवाय असं मानलं जातं की, मकर संक्रांतीला ऋतू परिवर्तन होते.
8/9
सूर्याच्या उत्तरायणानंतर हिवाळा संपत येतो. आणि शरद ऋतूची सुरुवात होत असते.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Jan 2026 02:01 PM (IST)