Makar Sankranti 2026 : सूर्य संक्रमणानंतर नवीन वर्षात कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? तर कोणत्या राशींसाठी धोक्याचा काळ
Makar Sankranti 2026 : 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ कर्म, शिस्त आणि जबाबदारी यांचं प्रतीक मानला जातो.

Makar Sankranti 2026
1/12
नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत असते. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर येणारी मकर संक्रांत ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
2/12
14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ कर्म, शिस्त आणि जबाबदारी यांचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे या सूर्य संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या स्वरुपात दिसून येणार आहे.
3/12
मकर : या काळात मकर राशीतील लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य लाभू शकतं. त्यामुळे या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमचं स्थैर्य टिकून राहील.
4/12
मेष : मेष राशीच्या लोकांना नवीन काम, स्टार्टअप किंवा नोकरीत संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात प्रमोशन देखील तुम्हाला मिळू शकतं.
5/12
सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींना नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळेल. या राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य लाभू शकतं.
6/12
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना मीडिया, डिजिटल, शिक्षण क्षेत्रातून फायदा होऊ शकतो.
7/12
कर्क : कर्क राशीला भावनिक अस्थिरता आणि घरगुती तणाव जाणवू शकतो. गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
8/12
वृश्चिक : वृश्चिक राशीला ऑफिस पॉलिटिक्स किंवा विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो.
9/12
मीन : मीन राशींनी मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.अनावश्यक खर्च, फसवणूक किंवा आर्थिक गोंधळाला सामोरं जावं लागू शकतं.
10/12
कुंभ : मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. गुंतवणूक करताना सावधान राहा. फसवणुकीला सामोरे जावे लागेल.
11/12
मकर संक्रांतीला सूर्याला अर्घ्य देणं, तिळाचं दान करणं आणि निर्णय घेताना संयम बाळगणं फायदेशीर ठरू शकतं.
12/12
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Jan 2026 09:20 AM (IST)