Makar Sankranti : आज मकर संक्रांतीला काय करावं आणि काय करू नये? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
Makar Sankranti 2026 : ज्योतिष शास्त्रामध्ये मकर संक्रांतीसाठी काही विशेष नियम सांगितलेले आहेत ज्याचे पालन केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते आणि पुण्य लाभते.

Makar Sankranti 2026
1/11
हिंदू शास्त्रानुसार मकर संक्रांती अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देते. आजच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, याला उत्तरायण म्हणतात. तसेच शास्त्रामध्ये मकर संक्रांतीसाठी काही विशेष नियम सांगितलेले आहेत ज्याचे पालन केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते आणि पुण्य लाभते.
2/11
ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी चांगले कार्य केल्यास योग्य फळ मिळते. तसेच, काही असे कार्य आहेत जे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. जाणून घेऊयात. आजच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये.
3/11
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे, तसे शक्य नसल्यास घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून अंघोळ घ्यावी.
4/11
अंघोळ झाल्यावर एका तांब्याच्या पात्रात लाल पुष्प, जल, काळे तीळ घालून ते सूर्य देवाला अर्पण करावे. आणि “ॐ सूर्याय नमः” या मंत्राचा जप करावा.
5/11
आहारात तिळाचा समावेश करावा. उदा. तिळाचे लाडू. असे केल्यास शनीचा दोष लागत नाही.
6/11
तसेच सूर्यदेवाला खिचडी प्रसाद म्हणून अर्पण करावी, आणि गरजू व्यक्तींनाही दान करावी, हे एक पुण्याचे काम असल्याने तुम्हाला देखील पुण्य लाभेल.
7/11
हिंदू शास्त्रानुसार, पशु प्राण्यांची सेवा करावी, विशेषतः गाईला चारा, गुल किंवा तिळाचे पदार्थ खायला द्या असे केल्यास देवी देवता तुमच्यावर प्रसन्न राहतील.
8/11
तसेच मकर संक्रांती हा सण सूर्य देवासाठी अर्पण केलेला असतो, त्यामुळे सूर्योदय होण्याच्या आधी उठावे, सूर्योदयानंतर उठणे शास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. तसेच हिंदू शास्त्रानुसार, सकाळी उठल्यानंतर अंघोळ न करता जेवण किंवा प्रसाद खणू नये.
9/11
हिंदू धर्मशास्त्रानुसार आजच्या दिवशी झाडांना हानी पोहोचवणे पाप आहे.
10/11
आजच्या दिवशी तुम्हाला मांसाहारी अन्न, मद्य यांपासून दूर राहणं गरजेचं आहे.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Jan 2026 11:26 AM (IST)