Mahashivratri 2026 : केदारनाथ ते काशी विश्वनाथ; भारतातील भगवान शंकराची 'ही' आहेत प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग...
Mahashivratri 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, महाशिवरात्रीला प्रचंड महत्त्वाचं स्थान आहे. या निमित्ताने भाविक भारतातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना देखील भेट देतात. पण, यामागचं महत्त्व जाणून घेऊयात.

Mahashivratri 2026
1/15
भारतात महाशिवरात्री तसेच भगवान शंकराला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. असं म्हटलं जातं की, भगवान शंकर वेगवेगळ्या ठिकाणी ज्योती रूपात प्रकट झाले होते.
2/15
ज्या ठिकाणी महादेव प्रकाशस्तंभाच्या रूपात (ज्योती रूपात ) प्रकट झाले त्या त्या ठिकाणांना तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
3/15
पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ : सोमनाथ ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे. हे वेरावळजवळ गुजरातमध्ये वसलेले आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्राचीन असून, अनेक आक्रमणांनंतरही त्याची महती कायम आहे .
4/15
दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन : हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशातील कृष्ण जिल्ह्यात कृष्ण नदीच्या काठी श्रीशैल पर्वतावर वसले आहे. येथे भगवान शिव (मल्लिकार्जुन) आणि माता पार्वती (भ्रामरांबा) एकत्रित विराजमान आहेत. हे ठिकाण शैव आणि शाक्त दोन्ही संप्रदायांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून 52 शक्तीपीठांपैकी एक आहे.
5/15
तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर : हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. हे भारतातील एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर 'काल' (मृत्यू) आणि काळाच्या पलीकडील देवाचे प्रतीक मानले जाते, जिथे महाकाल स्वरूपात भगवान शिवाची पूजा केली जाते. येथे भस्म आरती प्रसिद्ध आहे.
6/15
चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर : हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मध्य प्रदेशातील खंडवा येथे, नर्मदा नदीच्या काठी एका बेटावर आहे. हे ओंकार 'ॐ' च्या आकाराचे असल्यामुळे ओंकारेश्वर म्हणतात. येथे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर अशी दोन प्रमुख मंदिरे असून, ती धार्मिक आणि पौराणिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जातात.
7/15
पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ : केदारनाथ धाम हे उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक आहे. जेथे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. मंदाकिनी नदीकाठी वसलेले भगवान शिवाचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
8/15
सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर : हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात वसले आहे. या ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव असेही म्हणतात. प्राचीन दगडी स्थापत्यशैली असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते.
9/15
सातवे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ : हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्थित आहे. हे मंदिर 'विश्वनाथ' किंवा 'विश्वेश्वर' (विश्वाचा स्वामी) म्हणून ओळखले जाते, जे मोक्ष प्रदान करणारे आणि पाप नाशक मानले जाते. अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला.
10/15
आठवे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर : हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पुराण कथेनुसार, भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी गौतम ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती.त्यांच्या तपश्चर्येला पाहून भगवान शंकर येथे प्रकट झाले होते.
11/15
नववे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ : हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळी वाद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे.
12/15
दहावे ज्योतिर्लिंग नागेश्वर : हे ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग देखील गुजरातमध्ये आहे. बडोदा जिल्ह्यातील गोमती द्वारकेजवळ असलेल्या या मंदिराविषयी असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या इच्छेमुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले.
13/15
अकरावे ज्योतिर्लिंग रामेश्वर : हे ज्योतिर्लिंग तमिळनाडूमध्ये रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे, अशी आख्यायिका आहे की लंकेवर हल्ला करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले.
14/15
बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर : हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातही औरंगाबादजवळील दौलताबाद येथे आहे. हे भगवान शिवाचे 12 वे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाला घुष्मेश्वर असेही म्हणतात.
15/15
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Feb 2026 04:36 PM (IST)