Maghi Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंतीला करा 'हे' उपाय; बाप्पाचा मिळेल आशीर्वाद, सुख-समृद्धीत होईल भरभराट
Maghi Ganesh Jayanti 2026 : प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. त्यानुसार, या महिन्यामध्ये 22 तारखेला बाप्पाची जयंती साजरी केली जाणार आहे.

Maghi Ganesh Jayanti 2026
1/9
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील गणेश जयंतीला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व माघी गणेश जयंतीला आहे. बाप्पाचा कोणताही सण असो भाविक अगदी मनोभावे बाप्पाची आराधना, भक्ती करतात.
2/9
प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. त्यानुसार, या महिन्यामध्ये 22 तारखेला बाप्पाची जयंती साजरी केली जाणार आहे.
3/9
बाप्पा सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. त्यामुळे या माघी गणेश जयंतीला बाप्पाची मनोभावे सेवा केल्यास तुमच्या आयुष्यातील संकट दूर होतील.
4/9
तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढावी, कोणत्याही अडचणी वाढू नयेत यासाठी बाप्पाची कृपा असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी या जयंतीला तुम्ही काही उपाय करू शकता.
5/9
बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना बाप्पाला 21 दुर्वांची जुडी गणपतीला अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा.
6/9
तसेच बाप्पाचं आवडतं लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करा. आणि नैवेद्य म्हणून 21 तिळाचे लाडू द्या.
7/9
पुराणांमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी पूजा करताना पूजेच्या ताटात दिवा, अगरबत्ती किंवा धूप, फळं आणि फुलं देवाला अर्पण करायला विसरू नका.
8/9
तसेच लाल कुंकूने दारात स्वस्तिक काढून त्याखाली शुभ-लाभ लिहा. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. त्यामुळे घरी सकारात्मक ऊर्जेचे वातावरण असते.
9/9
तसेच, ‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥’ आणि ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्रांचा जप किमान 108 वेळा करावा. त्यामुळे गणपती बाप्पाची कृपादृष्टी तुमच्यावर नेहमी राहील.
Published at : 21 Jan 2026 03:42 PM (IST)