एक्स्प्लोर
Love Astrology: प्रेमात 'या' भेटवस्तू प्रेमभंग करू शकतात! प्रेमात 'ही' भेट कधी ही देऊ नका, अन्यथा ब्रेकअप निश्चित, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Love Astrology: प्रेमात भेटवस्तू देणे ही प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत असते, पण ज्योतिष शास्त्रानुसार काही भेटवस्तू अशुभ मानल्या जातात आणि त्या नात्यात ताणतणाव किंवा प्रेमभंग देखील करू शकतात.
Love Astrology marathi news These gifts in love can break the love Never give this gift in love
1/7

घड्याळ – घड्याळ भेट देणे हे नात्याच्या वेळेची मोजणी सुरू झाल्याचे लक्षण मानले जाते. यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते, असे म्हटले जाते.
2/7

काळा रूमाल / कपडे – काळा रंग नकारात्मक उर्जा आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानला जातो. हा रंग नात्यात गैरसमज निर्माण करतो, अशी धारणा आहे.
3/7

छत्री – छत्री दिल्याने नात्यात अंतर येते किंवा वेगळेपणा येतो, असे मानले जाते. त्यामुळे प्रिय व्यक्तीस छत्री भेट देणे टाळावे.
4/7

चाकू, कात्री, धारदार वस्तू – अशा वस्तूंना “नातं कापणारे” असे मानले जाते. हे भेट दिल्यास वाद-विवाद, भांडणं किंवा संबंधात कटुता येऊ शकते.
5/7

पर्स किंवा बटवा – पर्स किंवा बटवा रिकामा दिला तर ते आर्थिक नुकसान किंवा प्रेमात दुर्बलता दर्शवतो. जर द्यायचा असेल तर त्यात थोडे पैसे ठेवून द्यावेत.
6/7

मोत्याचे दागिने– मोती हा दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मोत्याचे दागिने भेट दिल्यास भावनिक वेदना येऊ शकतात, असे काही ज्योतिष मानतात.
7/7

(हे नियम पूर्णतः श्रद्धेवर आधारित आहेत. काहीजण यांना महत्त्व देतात, तर काहीजण प्रेम आणि नात्याला भावना आणि परस्पर समजुतींवर आधारलेले मानतात. पण जर तुम्ही किंवा तुमचे पार्टनर ज्योतिष किंवा परंपरांवर विश्वास ठेवत असाल, तर अशा वस्तू टाळणे हे नातं टिकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते)
Published at : 27 May 2025 02:54 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















