Kumbh Mela 2025 : प्रयागराजनंतर पुढचा कुंभमेळा नेमका कुठे आणि कधी असणार? वाचा सविस्तर माहिती...
Kumbh Mela 2025 : हिंदू धर्मात, कुंभ मेळ्याचं वेगळं धार्मिक महत्त्व आहे. त्यानुसार 2025 चा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आला.

Kumbh Mela 2025
1/7
हा कुंभ मेळा 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. मात्र, प्रयागराज नंतर आता पुढचा कुंभ मेळा नेमका कधी आणि कुठे असणार आहे. याबाबत जाणून घेऊयात.
2/7
प्रयागराज येथे असलेला महाकुंभ मेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय. या महाकुंभ मेळ्याची सुरुवात 13 जानेवारी रोजी सुरु झाली.
3/7
त्याचबरोबर कुंभ मेळा साधु-संत, गुरु आणि भक्तांचं केंद्रस्थान मानलं जातं. कुंभ मेळ्याचं आयोजन हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक सारख्या ठिकाणी केलं जातं.
4/7
शास्त्रानुसार, महाकुंभ मेळा 144 वर्षांत एकदा आयोजित केला जातो. 2025 नंतर पुढचा महाकुंभ 2169 मध्ये होणार आहे.
5/7
मात्र, या महाकुंभ व्यतिरिक्त अधून-मधून कुंभ, अर्धकुंभ आणि कुंभ मेळ्याचं आयोजन या पवित्र ठिकाणी होतं.
6/7
प्रयागराज नंतर आता पुढचा कुंभ मेळा 2027 मध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात होणार आहे. हा मेळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर 2028 मध्ये उज्जैन येथे होणार आहे.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Feb 2025 01:00 PM (IST)