Hindu Religion: मासिक पाळीच्या काळात लोणच्याला स्पर्श केला तर ते खरंच खराब होते का? जया किशोरींनी दिलं जबरदस्त उत्तर..
Hindu Religion: समाजात आजही काही ठिकाणी मासिक पाळीच्या काळात मुलींनी लोणच्याला हात लावू नये, असे म्हटले जाते. यावर मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरींनी मत व्यक्त केलं, ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली

Hindu Religion marathi news touching pickles during women menstruation really make them bad Jaya Kishori gave great answer
1/7
अनेकदा आपण आपल्या घरात किंवा आजूबाजूस काही लोकांकडून अशा काही गोष्टी ऐकतो, ज्यांना पाहायला गेलं तर कोणताही ठोस आधार नसतो, मात्र अनेकजण त्या ऐकल्यावर खऱ्या म्हणून स्वीकारतात. महिलांबाबत बोलायंचं झालं तर आजही अनेक ठिकाणी त्यांना मासिक पाळीच्या काळात अस्पृश्याप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यापैकीच अशी एक गोष्ट म्हणजे मासिक काळात मुलींनी लोणच्याला हात लावू नये, नाहीतर लोणचे खराब होईल.
2/7
अलीकडेच सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांनी यावर आपले मत व्यक्त केले, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. जया किशोरी यांनी एका मुलाखतीत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी लोणच्याला स्पर्श करून खराब होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही.
3/7
जया किशोरी म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी जेव्हा साफसफाईची विशेष साधने नव्हती, तेव्हा महिलांना काही काळ स्वयंपाकघरापासून दूर ठेवले जायचे. पण आजच्या काळात स्वच्छतेची पूर्ण व्यवस्था असतानाही अशा गोष्टी सर्रासपणे सुरू आहेत, ज्यांना ठोस आधार नाही.
4/7
जया किशोरी यांनी स्पष्टच सांगितले की, अनेक वेळा मुलींना लोणच्याला हात लावल्यास संपूर्ण डबा खराब होईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे मुलींच्या मनात भीती निर्माण झाली. वास्तविक, त्यांना घाबरवण्याचा हा एक मार्ग होता, जेणेकरून ते अन्नपदार्थ दूषित होईल असे काहीही करू नये, कारण पूर्वी इतकी स्वच्छता नव्हती आणि वैद्यकीय सुविधाही नव्हत्या.
5/7
जया किशोरी पुढे म्हणाल्या की, आजच्या काळात सर्व प्रकारच्या सुविधा आणि माहिती उपलब्ध असतानाही कोणी विनाकारण हे जुने नियम पाळत असेल तर ते केवळ अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. मासिक पाळीच्या काळात वापरात येणारे पॅड, टॅम्पोन्स यासारख्या गोष्टी पूर्वी नव्हत्या. अशा वेळ महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
6/7
जया किशोरी म्हणतात प्राचीन काळी, प्राण्यांपासून देखील धोका होता, कारण रक्ताच्या वासाने प्राणी आकर्षित होऊ शकतात. अशा परिस्थितीत महिलांना सुरक्षित राहावे म्हणून त्यांना घराच्या एका कोपऱ्यात किंवा वेगळ्या खोलीत ठेवले जात असे. जया किशोरी म्हणाल्या की, कालांतराने या परंपरांचा इतका अतिरेक झाला की मासिक पाळीच्या काळात महिलांना 'अपवित्र' समजले जाऊ लागले. पण नीट विचार केला तर हा फक्त त्यावेळच्या गरजेनुसार घेतलेला निर्णय होता, जो नंतर चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Apr 2025 11:40 AM (IST)