एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Hanuman Jayanti 2025 : बाल हनुमान, संकटमोचन, पंचमुखी... भगवान हनुमानाची 'ही' 9 रुपं तुम्हाला माहितीयत का?
Hanuman Jayanti 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतात. पण, तुम्हाला माहित आहे भगवान हनुमानाची अशी 9 रुपं आहेत. ही 9 रुपं नेमकी कोणती ते पाहा.
Hanuman Jayanti 2025
1/10

यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानाची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच, हनुमानाची पूजा केल्याने शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद मिळतो.
2/10

दक्षिणमुखी हनुमान - जेव्हा भगवान हनुमानाचं मुख दक्षिण दिशेला असेल तेव्हा त्याला दक्षिण मुखी म्हणतात. हनुमानाची या रुपात पूजा केल्याने भीती, संकट आणि सर्व चिंता दूर होतात.
3/10

सूर्यमुखी हनुमान - भगवान हनुमानाचं हे रुप सूर्यदेवाला समर्पित आहे. भगवान हनुमान सूर्यदेवाला आपला गुरु मानतात. त्यामुळे सूर्यमुखी हनुमानाची पूजा केल्याने तुम्हाला ज्ञान आणि प्रगती मिळेल.
4/10

संकटमोचन हनुमान - भगवान हनुमानाचं हे रुप भक्तांची सर्व संकटं दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे या मंदिराला संकटमोचन हनुमान म्हणतात.
5/10

बाल हनुमान - बाल हनुमानाच्या रुपात भगवान हनुमान शुद्ध, निरागस आणि अलौकिक शक्तींनी परिपूर्ण असे असतात.
6/10

वीर हनुमान - भगवान हनुमान यांनी या रुपात आपल्या बळाने द्रोणागिरी पर्वत उचलला होता. तसेच, संपूर्ण लंकेला आग लावली होती. यामुळे तुमची भीती दूर होते.
7/10

रुद्र हनुमान - भगवान हनुमान या रुपात क्रोधित दिसतात. त्यामुळे त्यांच्या या रुपाची पूजा केली जात नाही.
8/10

रामभक्त हनुमान - हे हनुमानाचं सर्वात प्रसिद्ध रुप आहे. ज्यामध्ये भगवान हनुमान राम आणि सीता यांच्या भक्तीत लीन आहेत. त्यांच्या हृदयात भगवान राम आणि सीता यांचं चित्र आहे
9/10

योग हनुमान - या रुपात भगवान हनुमान ध्यानमग्न मुद्रा अवस्थेत आहेत. भगवान हनुमान योग, साधना आणि शक्तीचं प्रतीक आहे.
10/10

पंचमुखी हनुमान - या रुपात भगवान हनुमान पंचमुखी अवतारात आहेत. जे हनुमान, नरसिंह, गरुड, वराह आहेत.
Published at : 11 Apr 2025 03:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























