एक्स्प्लोर
Guru Uday 2025 : 9 जुलैला 'या' राशींना सतर्कतेचा इशारा, गुरु ग्रहाच्या उदयामुळे होणार प्रचंड नुकसान; घोंगावणार संकटांचं वादळ
Guru Uday 2025 : गुरु ग्रहाचा उदय येत्या 9 जुलैला होणार आहे. गुरु ग्रहाच्या चालीमुळे काही राशींवर संकटाचं वादळ घोंगाऊ शकतं.
Guru Uday 2025
1/8

ज्योतिष शास्त्रानुसार, शिक्षण, धन-संपत्ती, नोकरी आणि विवाहाचा कारक ग्रह गुरु ग्रहाला मानतात. गुरु ग्रहाचा उदय येत्या 9 जुलैला होणार आहे. गुरु ग्रहाच्या चालीमुळे काही राशींवर संकटाचं वादळ घोंगाऊ शकतं. या राशींना सावध राहण्याची गरज आहे.
2/8

गुरु ग्रहाची अतिचारी चाल मीन राशीसाठी शुभ ठरणार नाही. विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
3/8

मिथुन राशीसाठी बृहस्पतीचा उदय फार धोकादायक ठरु शकतो. या काळात जोडीदाराबरोबर तुमचे वाद होऊ शकतात. तसेच, व्यवसायात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
4/8

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, धनसंपत्तीची हानी होऊ शकते. पैशांची गुंतवणूक करणं लाभदायी ठरेल.
5/8

मकर राशीच्या सहाव्या चरणात गुरुचा उदय होणार आहे. त्यामुळे या राशीवर संकटांचा डोंगर उभा राहू शकतो. या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. गुंतवणुकीतून तुम्हाला तोटा होईल.
6/8

कन्या राशीच्या तिसऱ्या चरणात गुरुचा उदय होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नसणार आहे. बृहस्पतीच्या उदयाने तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार नाही.
7/8

गुरुच्या उदय होण्यामुळे तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करु शकता. तसेच, केळ्याच्या झाडाला पाणी द्या. गुरुची सेवा करा.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Jul 2025 11:12 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















