Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 'या' वस्तू करा दान, धन-संपत्तीत होईल भरभराट!
Kojagiri Purnima 2025 : हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, कोजागिरी पौर्णिमेला काही वस्तूंचे दान केल्याने आर्थिक संकट पैशाची तंगी या त्रासांपासून मुक्ती मिळते.
Continues below advertisement
Kojagiri Purnima 2025
Continues below advertisement
1/8
शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. यंदा कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.
2/8
कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी दूर होतात.
3/8
कोजागिरी पौर्णिमेला तांदूळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशांची भरभराट होते.
4/8
तांदूळ हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. इतकेच नाही, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात.
5/8
कोजागिरी पौर्णिमेला दूध आणि खीर यांचं विशेष महत्त्व आहे. दूध दान केल्याने घरात सकारात्मकता आणि आर्थिक लाभ मिळतो. तर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर दान केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होते.
Continues below advertisement
6/8
कोजागिरी पौर्णिमेला गरजूंना कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि घरात धन-संपत्तीची वाढ होते.
7/8
कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही फळांचं दान देखील करु शकता. फळांचे दान केल्याने सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि धनाची प्राप्ती होते.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Oct 2025 10:23 AM (IST)