Dahi Handi 2024 Wishes : दहीहंडीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; फोडा अहंकाराची हंडी, पाठवा 'हे' शुभेच्छापर फोटो

जल्लोष आणि आनंदाची नांदी.. मिळून फोडा चैतन्याची हंडी.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोण्यासाठी भांडणारा.. आणि गोपिकांना छेडणारा.. सर्वांचा प्रिय असा कान्हा.. सगळ्यांचा रक्षणकर्ता.. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

विसरून सारे मतभेद.. लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वधर्म समभाव मनात जागवून.. आपुलकीची दहीहंडी फोडा.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
दह्यात साखर, साखरेत भात, दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावून उंच थर, जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण, दहीहंडीच्या शुभेच्छा!
तुझ्या घरात नाही पाणी.. घागर उताणी रे गोपाळा.. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, लोणी चोरायला आला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
हंडीवर आमचा डोळा… ह्या दुधाचा काला.. हे नाद करायचा नाही औंदा आला दहा थरांचा गोविंदा… दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण.. थरावर थर रचून झाले मित्र सज्ज.. मटकी फोडू, खाऊ लोणी.. गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
खिडकीतल्या ताई-अक्का पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका.. दहीहंडीच्या शुभेच्छा!
फुलांचा हार.. पावसाची सर.. राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर.. साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!