एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Budhaditya Yog 2025 : सूर्य-बुध ग्रहाचा जुळून येतोय महासंयोग; 23 मे पासून 'या' राशी जगतील राजासारखं जीवन, हातात खेळेल पैसा
Budhaditya Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिन्यात बुध आणि सूर्य दोन्ही ग्रह वृषभ राशीत एकत्र येणार आहेत. यामुळे बुधादित्य योग जुळून येणार आहे. या योगाला फार शुभ मानण्यात आलं आहे.
Budhaditya Yog 2025
1/8

बुध ग्रह 23 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य आणि बुध ग्रह एका राशीत येतात तेव्हा त्याला बुधादित्य योग म्हणतात.
2/8

हा योग 6 जूनपर्यंत असणार आहे. मात्र, याचा प्रभाव 15 जूनपर्यंतच पाहायला मिळणार आहे. यामुळे तुमच्या करिअर, शिक्षण आणि व्यवसायात चांगला मान-सन्मान तुम्हाला मिळेल.
3/8

सूर्य ग्रहाला मान-सन्मान, नेतृत्व आणि प्रशासन तसेच, ऊर्जेचं प्रतीक मानण्यात आलं आहे. तर, बुध ग्रहाला बुद्धी, तर्कशक्ती आणि व्यवसायाशी संबंधित मानण्यात आलं आहे.
4/8

बुधादित्य योग मिथुन राशीच्या लोकांसाठी फार चांगला ठरणार आहे. या योगामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसे, तुमच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या समस्या दूर होतील.
5/8

बुधादित्य योग सिंह राशीसाठी देखील फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्ही आध्यात्माकडे वळाल. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तसेच, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होतील.
6/8

बुधादित्य योग कन्या राशीसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
7/8

बुधादित्य योग वृश्चिक राशीसाठी फार चांगला असणार आहे. या काळात तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 May 2025 03:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























