एक्स्प्लोर
Budh Gochar 2025 : जून महिन्यात एक, दोनदा नाही तर तब्बल 6 वेळा बुध ग्रह बदलणार चाल; वाचा काय होणार परिणाम?
Budh Gochar 2025 : जूनचा महिना ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या महिन्यात ग्रहाचा राजकुमार बुध ग्रह सहा वेळा राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे.
Budh Gochar 2025
1/8

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह एक दोनवेळा नाही तर तब्बल 6 वेळा राशी संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. बुध ग्रहाच्या चालीने काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.
2/8

जूनचा महिना ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या महिन्यात ग्रहाचा राजकुमार बुध ग्रह सहा वेळा राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. बुध ग्रहाच्या चालीत बदलामुळे काही राशींच्या जीवनावर परिणाम दिसून येणार आहे.
3/8

बुध ग्रहाच्या चालीत सर्वात पहिला बदल 3 जून रोजी झाला. या दिवशी बुध ग्रहाने मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर 6 जून रोजी बुध ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीत झालं. त्यानंतर 9 जून रोजी बुध आर्द्रा नक्षत्रात प्रवेश झाला आहे. तर, 16 जून रोजी पुनर्वसु नक्षत्रात येणार आहे.
4/8

22 जून रोजी बुध ग्रहाचं संक्रमण कर्क राशीत होणार आहे. तर, 25 जून रोजी बुध ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार ते पाहूयात.
5/8

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची चाल आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरेल. बुध ग्रहाच्या संक्रमणाने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा लाभ मिळेल. या काळात धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
6/8

वृश्चिक राशीच्या लोकांना या कालावधीत अप्रत्यक्षपणे धनलाभ मिळेल. या काळात तुमचं आरोग्यही उत्तम राहील. तसेच, तुमच्या कामात कोणताच अडथळा येणार नाही. बुद्धी आणि तर्कशक्तीने तुम्ही कार्य कराल.
7/8

मीन राशीच्या लोकांसाठी या काळात चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. बुध ग्रहाची कृपा तुमच्यावर असणार आहे.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 11 Jun 2025 11:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















