Ashadhi Wari | कोरोनाच्या सावटाखालीच तुकोबांच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न!
(फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. शासनाच्या परवानगीनुसार, घालून दिलेल्या अटी-शर्थींसह पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
(फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
(फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
तुकोबांच्या पादुका मंदिरातून इंद्रायणी नदीत नेण्यासाठी फुलांच्या पायघड्या ही टाकण्यात आल्या होत्या. इंद्रायणी नदीत आरती आणि विधिवत पूजा पार पडल्या. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसोबतच सण-उत्सवही रद्द करावे लागले आहेत. अशातच कोरोनाचा परिणाम पंढरपूरच्या वारीवरही झाल्याचं दिसत आहे. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
कोरोनाच्या सावटाखालीच पार पडत असलेल्या वारीत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडलं. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
(फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखी नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेंव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
परंपरेनुसार जिथं तुकोबारायांच्या नीरा स्नान पार पडायचं तिथून देहू संस्थानने रात्रीतच हंडाभर पाणी आणले आणि तुकोबांच्या मंदिरा लगतच्या इंद्रायणी नदीत हा सोहळा पार पडला. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
पालखी सोहळा देहूनगरीत मुक्कामी असताना हे कसं पार पडलं? असा प्रश्न वारकरी संप्रदयांसह अख्ख्या महाराष्ट्राला पडला असेल. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -