Apple Watch Series 6 | Apple वॉच सीरीज 6 लॉन्च; 'हे' आहेत खास फिचर्स
अॅपल वॉच 6 चा वापर करून ब्लड ऑक्सिजनबाबत फक्त 15 सेकंदात माहिती मिळते. कोरोना संसर्गात वॉचमध्ये देण्यात आलेलं ऑक्सिजन सेंसर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे. सीरीज 5 च्या तुलनेत हे वॉच 15 टक्के फास्ट काम करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही याचा वापर प्रखर उन्हातही करू शकणार आहात. हे वॉच राउंड डायलसोबत युजर्सना मिळणार आहे. दिसायला अॅपल वॉच सीरीज 5 प्रमाणेच अॅपल वॉच 6 आहे. या वॉचसाठी 6 रंगांच्या स्ट्रॅप्स उपलब्ध असणार आहेत.
यामार्फत डेली वर्कआऊटला ट्रॅक केलं जाऊ शकतं. या सर्व्हिसचा वापर करण्यासाठी काही पॅकेजेस आहेत. ज्यामध्ये मंथली $9.99 आणि एका वर्षासाठी $ 79.99 मोजावे लागणार आहेत. कस्टमर्सना 3 महिन्यांसाठी Apple Fitness+ सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.
अॅपल वॉच सीरीज 6 साठी नव्या Fitness+ सर्विसचाही समावेश करण्यात आला आहे. जी तुम्हाला फिटनेसबाबत सतर्क करणार आहे. यामार्फत यूजर्स वर्कआऊट सेशन्समध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
अॅपल वॉचमध्ये आणखी एक फिचर सहभागी करण्यात आलं आहे. ज्याचं नाव Memoji सपोर्ट आहे. म्हणजेच, यूजर्स iMessage app मार्फत Memoji एकमेकांना पाठवू शकतात. हे नवं अॅपल वॉच watchOS 7 ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित असणार आहे.
अॅपल वॉच सीरीज 6 च्या या वॉचमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. सोलो लूप्स डिझाइन असणारं हे वॉच यूजर फ्रेंडली आहे आणि अगदी सहज मनगटावर फिट होतं.
भारतीय बाजारात अॅपल वॉच सीरीज 6 (GPS) व्हेरिएंटची किंमत 40,900 रुपये आणि (GPS+Cellular) मॉडल 49,900 रुपयांत मिळणार आहे. तसेच अमेरिकेत या वॉचच्या GPS मॉडलची किंमत $399 (जवळपास 30,000 रुपये) असणार आहे. शुक्रवारपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
Apple ने आपल्या Time flies इव्हेंटमध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटर फिचर असलेली नवी अॅपल वॉच सीरीज 6 लॉन्च केली आहे. या वॉचमधील खास फिचरम्हणजे, यात देण्यात आलेलं ह्यूमन ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक फिचर.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -