PHOTO | श्रीदेवींनी प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं, म्हणूनच चाहत्यांच्या मनावर शेवटपर्यंत अधिराज्य गाजवलं
वयाच्या चौथ्या वर्षी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात. श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमल हासनसोबतच्या सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली.
मग चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं.
24 फेब्रुवारी रोजी 2018 वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी दुबईत कार्डिअॅक अरेस्टने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक मृत्यूने त्या आपल्या परिवारासह चाहत्यांना 'सदमा' देऊन गेल्या.
श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता.
सर्व फोटो- गूगलवरुन साभार
त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.
गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
त्यांनी अनेक भूमिकांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -