IN PICS | प्रियंका चोप्राचं न्यूयॉर्कमध्ये नवं रेस्टॉरंट; भारतीय खाद्यपदार्थांची मेजवानी

(Image Credit : Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दरम्यान, या पोस्टवर बॉलिवूड अभिनेते फरहान अख्तरसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. सर्वांनी प्रियंकाला रेस्टॉरंटच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याव्यतिरिक्त प्रियंकाने आपल्या रेस्टॉरंटशी निगडीत काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये प्रियंका पती निक जोनससोबत पूजा करताना दिसत आहे.
प्रियंकाने आपल्या टीमलाही शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सांगितलं की, खासकरुन डिझायनर मेलिसा बोवर्स आणि संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा, ज्यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं.
प्रियंकाने आपल्या रेस्टॉरंटबाबत अधिक माहिती देत सांगितलं की, माझं रेस्टॉरंट या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. तुम्हा सर्वांच प्रेम आणि पाठिंब्यामुळे आज मी हे करु शकले.
फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिलं आहे की, मी तुम्हाला माझ्या नव्या रेस्टॉरंटबाबत (SONA) सांगताना खूप खूश आहे. हे एक असं रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला भारतीय व्यंजनं चाखता येतील. मी खास मेन्यू माझ्या रेस्टॉरंटसाठी तयार केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये आपल्या नव्या व्यावसायाला सुरुवात केली आहे. तिने सोशल मीडियामार्फत यासंदर्भात माहिती दिली. प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नव्या रेस्टॉरंटचे फोटो शेअर केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -