Yavatmal News: यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात पिसाळलेल्या माकडाचा (Monkey) बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या पथकाकडून एक मोठी चूक झाली. माकडाला बेशुद्ध करण्यासाठी मारलेला डार्ट चुकून एका नागरिकाला लागल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर सदर नागरिकाला तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. (Yavatmal News)
नेमकं काय घडलं? (Yavatmal News)
गेल्या काही दिवसांपासून भवानी येथे एका पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता. या माकडाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले, तेव्हा माकडाला बेशुद्ध करण्यासाठी शूटरने निशाणा धरला. मात्र, माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा अचूक निशाणा चुकला आणि ट्रॅन्क्विलायझर गनमधून सुटलेले इंजेक्शन (डार्ट) थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना जाऊन लागले.
इंजेक्शन लागताच सदानंद खराटे जखमी- (Yavatmal News)
इंजेक्शन लागताच खराटे जखमी झाले. वनविभागाच्या या चुकीच्या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
