एक्स्प्लोर

Yavatmal Crime News: मुख्याध्यापिकेचे लव्ह मॅरेज, वर्षभरातच बिनसलं, शिक्षक पतीला संपवलं, शाळेतल्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मृतदेह जाळला, यवतमाळ हादरलं

Yavatmal Crime News: शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला

यवतमाळ: महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे. मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारले. शंतनू देशमुख (32, रा. सुयोगनगर) यांचा मृतदेह जंगलामध्ये निर्जनस्थळी अर्धवट स्वरूपात जळाल्याचा आढळून आलं होतं, पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्यध्यापिकेने तीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंतनू अरविंद देशमुख (32, रा. सुयोगनगर) असं मृत पतीचं नाव आहे. तर निधी शंतनू देशमुख असं आरोपी पत्नीचं नाव आहे. दोघेही एकाच शाळेत शिकवत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या नवरा बायकोचं वारंवार भांडण होत असे, त्यातूनच निधीने आपला पती शंतनू याला संपवल्याची माहिती समोर आली आहे. 13-14 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह आढळला होता. निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला होता. त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती  टाकला होता. त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त 

शंतनू आणि निधी यांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या प्रकरणी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला त्या दिवसानंतर तो गायब झाला होता. त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा ठरली

कशी पटली मृतदेहाची ओळख

अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरिरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करण्यात आले होते. मृताची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजुबाजुचे जिल्हे वाशीम वर्धा अमरावती ग्रामीण दाखल बेपत्ता लोकांची माहिती घेण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमांचा शोध घेतला असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख हा दिनांक 13 मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. 18 मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले.

गुगलवरून तयार केले विष

शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. लग्नानंतर काही दिवस आयुष्य चांगले चालले, पण शंतनूला दारूचे व्यसन लागले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि निधी तिच्या पतीपासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली. शंतनू हा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी निधी देशमुख ही देखील त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. या दोघांमध्ये प्रेम जुळलं. दरम्यान वर्षभरापूर्वी दोघांनी प्रेम विवाह केला. त्यानंतर ते आई वडिलांपासून दूर राहू लागले. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. शंतनू दारू पिऊन निधीला त्रास होत होता. शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपविण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने तिच्याकडे शिकवण्यासाठी येत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली.

पतीला संपवण्याच्या विचाराने तिने 13मे च्या रात्री तिच्या पतीला विष देऊन संपवलं. त्यानंतर त्याने मृतदेह रात्रभर घरातच ठेवला. ती दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय झाला. रात्री विद्यार्थ्यांच्या मदतीने शंतनूचा मृतदेह चौसाळा जंगलात नेण्यात आला आणि तिथे फेकण्यात आला. जेव्हा तिला भीती वाटू लागली की जर मृतदेहाची ओळख पटली तर तिच्या अडचणी वाढतील, तेव्हा ती पुन्हा जंगलात गेली आणि तिच्या पतीच्या शरीरावर पेट्रोल ओतून ते पेटवून दिले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
Embed widget