ABP majha Impact यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर राहणाऱ्या 12 वर्षीय वेदिक चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू (Vedika Chavan Death Case) झाला होता. वेदिकाच्या दुर्दैवी मृत्यूची आणि त्यासाठी पाण्याचा दुर्भिक्ष कारणीभूत असल्याचे सत्य एबीपी माझाने दाखवल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. अशातच या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून काठोडा या पारधी वेड्यावर अखेर पाण्याचा एक तात्पुरता का होईना मात्र स्रोत निर्माण झाला आहे. एबीपी माझाने (ABP majha Impact) काठोडा गावातील वास्तव दाखवल्यानंतर आणि हंडाभर पाण्यासाठी वेदिका चव्हाण या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे कटू वास्तव समोर आणल्यानंतर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रशासन काल झोपेतून जागा झालं होतं.
दरम्यान, काल (18 एप्रिल) दुपारीच सोलर प्लेट्स काठोडा गावात पोहोचवण्यात आल्या होत्या. आज त्या सोलर प्लेटच्या माध्यमातून वीज पुरवठा देऊन बंद पडलेल्या हँडपंपच्या बोरमध्ये (Bore) मोटर बसवून नळ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील महिलांना गावातच पाणी मिळण्याची सोय निर्माण झाली आहे. त्यामुळे आज जरी गावात वेदिका नसली तरी तिच्या गावातील महिला आणि मुलींना पाण्याची सोय निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या पथकाची पारधी बेड्याला भेट
सद्यस्थितीत पारधी बेडा येथील बोअरवेलच्या सौर पंपातून पाणी पुरवठा सुरु आहे. सदर वस्तीमध्ये जलजिवन मिशन योजनेंतर्गत नव्याने 5 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सोलर पॅनल व पंप,उर्ध्व नलिका, वितरण व्यवस्था व घरघुती नळ जोडणीच्या कामाचा समावेश आहे. त्यापैकी वितरण व्यवस्था व नळ जोडणीचे काम पुर्ण करण्यात आले असून पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध न झाल्यामुळे काम करता आले नाही. सद्यस्थितीत पारधी बेडा वस्तीमध्ये असलेले 1 सोलरपंप व 1 हातपंपाद्वारे ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठा सुरु असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व आर्णी गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
वस्तीला हजार लिटरच्या टाकीवरुन पाणी पुरवठा
यावेळी गावातील सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ व मुलीच्या वडीलांसोबत चर्चा केली असता घटनेच्या दिवशी सकाळी 8 वाजता मैत्रीणींसोबत वेदीका कपडे धुण्यासाठी अरुणावती नदीच्या काठी गेली होती. त्यामध्ये नदीतील डोहामध्ये पाय घसरुण वेदीका पडली. त्यामध्ये तिचा बुडुन दुर्दैवी मृत्यु झाला, असे सांगितले. या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 1 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अस्तित्वात असलेल्या बोअरवेलवर 1 अश्वशक्ती क्षमतेच्या सौर पंपाद्वारे टाकी भरुन वस्तीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वस्तीत आणखी एक हातपंप असुन त्याद्वारे सुध्दा पाणी पुरवठा सुरु आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा