Hamas New Chief Yahya Sinwar : नवी दिल्ली : इराणनं (Iran) हमास प्रमुख इस्माईल हानिया (Ismail Haniyeh) यांची 31 जुलै रोजी हत्या करण्यात आलेली. हानियाच्या हत्येनंतर याह्या सिनवार (Yahya Sinwar) यांना हमासचं प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक प्रतिकार चळवळ हमासनं कमांडर याह्या सिनवार यांना चळवळीच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख म्हणून निवडल्याची घोषणा केली आहे. याह्या हे शहीद कमांडर इस्माइल हनियाची जागा घेतील. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलसोबत युद्ध सुरू झाल्यापासून याह्या सिनवार गाझामध्ये आहेत.


निर्वासीत छावणीत झालेला जन्म 


याह्या सिनवारनं आपलं अर्ध तारुण्य इस्रायली तुरुंगात घालवलं आहे आणि हानियाच्या पश्च्यात याह्या सिनवारचं हमासचा सर्वात शक्तिशाली नेता आहे. याह्या सिनवार सध्या 61 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म गाझामधील खान युनिस येथील निर्वासित छावणीत झाला आणि 2017 मध्ये गाझामध्ये हमासचा नेता म्हणून निवडून देण्यात आलं. इस्रायलचा कट्टर शत्रू म्हणून त्ंयाची ओळख होती.


कशी झालेली इस्माइल हानियाची हत्या? 


रिपोर्ट्सनुसार, इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नं बोलताना सांगितलं की, तेहरानमध्ये इस्माईल हानिया यांची हत्या करण्यात आली. हानिया, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्या उद्घाटनासाठी इराणच्या राजधानीमध्ये होते. हमासच्या वतीनं सांगण्यात आलेलं की, हानिया तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर विश्वासघातकी झिओनिस्ट हल्ल्यात ठार झाले आहेत. 


आयआरजीसीनं सांगितलं की, तेहरानमधील त्याच्या निवासस्थानाच्या बाहेरून 7 किलोग्रॅम वारहेडच्या गोळीबारात हनिया यांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या सरकारच्या पाठिंब्यानं इस्रायलनं हा हल्ला केल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. 


इस्रायलवर हत्येचा संशय 


इस्माईल हानियाच्या हत्येची जबाबदारी तात्काळ कोणीही स्वीकारली नाही, पण इस्रायलवर संशय बळावला आहे. कारण इस्रायलनं 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्माईल हानिया आणि इतर हमास नेत्यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. या हल्ल्यात 1,200 लोक मारले गेले आणि 250 जणांना ओलीस ठेवण्यात आलं. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हानिया तेहरानमध्ये दाखल झाले होते. हनिया यांची हत्या कशी झाली? याबाबत इराणनं कोणतीही माहिती दिलेली नाही.