नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टसचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जेफ्री एपस्टीनसोबत असलेल्या संबंधांसाठी बिल गेटस फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची माफी मागितल्याचं काल समोर आलं आहे. जेफ्री एपस्टीनशी संबंध असल्याचं समोर येताच जगभरात विविध ठिकाणी राजीनामे होत आहेत.वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समध्ये नाव आल्यानंतर बोर्गे ब्रेंडे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा पत्रात त्यांनी याचा उल्लेख केलेला नाही.ब्रेंडे 2017 मध्ये वर्ल्ड इकोनॉमक फोरमचे अध्यक्ष झाले होते. ब्रेंडे यांनी एपस्टीनसोबत 3 बिझनेस डिनर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याशिवाय एपस्टीनसोबत ईमेल आणि टेक्स्ट मेसेज द्वारे संवाद केल्याचा आरोप देखील ब्रेंडेंवर आहे.  

Continues below advertisement

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. हा निर्णय लैंगिक शोषण प्रकरणात  दोषी ठरलेल्या अमेरिकेच्या जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समध्ये ब्रेंडे यांचं नाव आल्यानंतर घेण्यात आला आहे. ब्रेंडे राजीनाम्याबाबदल म्हणाले की खूप विचारपूर्वक वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्षपद आणि सीईओपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.आठ वर्षांचा कालावधी चांगला होता. ब्रेंडे यापूर्वी नॉर्वेचे विदेश मंत्री होते. राजीनामा देताना ब्रेंडे यानी त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. ही वेळ वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु ठेवण्याचा वेळ आहे, असं ब्रेंडे म्हणालेत. 

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून दावोस समिटचं आयोजन

ब्रेंडे यांनी त्यांच्या राजीनाम्या नंतरच्या वक्तव्यात एपस्टीनचा उल्लेख केला नाही. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे कोच चेअर आंद्रे हॉफमॅन आणि लैरी फिंक यांनी म्हटलं की ब्रेंडे यांच्या एपस्टीन सोबतच्या संबंधांची वकिलांकडून स्वतंत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. ब्रेंडे यांच्या जागी एलोइस ज्विंगगी अंतरिम अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम करतील. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम दावोस समिट आयोजित करतो. या ठिकाणी जगभरातील राजकीय नेते आणि बिझनेस लीडर्स एकत्र येतात.  

Continues below advertisement

एपस्टीन फाइल्स म्हणजे काय?

जेफ्री एपस्टीन लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरला होता, त्याचा मृत्यू देखील झाला आहे. अमेरिकन सरकारच्या निर्णयानंतर जेफ्री एपस्टीनशी संबंधित फोटो, व्हीडिओ आणि ईमेलचा काही भाग सार्वजनिक करणयात आला आहे. यामध्ये जगभरातील विविध नेत्यांची नावं आली आहेत.