मुजफ्फराबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, मला त्या दिवसाची प्रतीक्षा आहे, ज्या दिवशी काश्मीर पाकिस्तनाचा एक भाग असेल. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये म्हणजेच ‘आजाद जम्मू एवं कश्मीर’मध्ये विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलते होते.

 

शरीफ हे ऑपरेशननंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील नागरिक स्वातंत्र्यांसाठी बलिदान देत आहेत. हे आपण विसरायला नको.”

 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पीएमएल-एन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

 

गेल्या अनेक वर्षांपासून भारताचं म्हणणं आहे की, जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळं करण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि शस्त्र पुरवले जातात. मात्र, पाकिस्तान कायमच भारताचा हा आरोप फेटाळला असून, फुटीरतावादी मोहिमेला केवळ राजकीय आणि नैतिक पाठिंबा असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येते.