Putin on Gas to European Markets: इस्त्रायल अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगाची ऊर्जा क्षेत्रामध्ये चांगलीच कोंडी झाली आहे. इराणने अवघ्या 33 किमीची पण जगासाठी लाईफलाईन असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने  खनिज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका चीन सोडून अन्य राष्ट्रांना बसणार आहे. कारण तशी धमकीच इराणकडून देण्यात आली आहे. चीनसोडून जर कोणी या मार्गातून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही उद्ध्वस्त करू असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतासह पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस आयातीवर अवलंबून असलेल्यांना मोठा झटका बसण्यास सुरुवात झाली आहे. 

Continues below advertisement

युरोपची कोंडी करण्याचं ठरवलं आहे का?

युरोपियन राष्ट्रांची इराणविरुद्धच्या युद्धात कोंडी झाली असतानाच जाता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आता युरोपची कोंडी करण्याचं ठरवलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे युद्ध कधी संपणार अशा चर्चा अनेक राष्ट्रांमध्ये होत असताना युरोपला गॅस पुरवठा करण्यासंदर्भात पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युरोपियन बाजारपेठेला गॅस पुरवठा थांबून नवीन बाजारपेठेमध्ये स्वतःला प्रस्थापित करणे आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल, असे पुतीन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युरोपसाठी नवी डोकेदुखी ठरणार का? रशियाचा गॅस युरोपला होणारा गॅसपुरवठा  मोठ्या प्रमाणात घसरला असला तरीही एकूण गॅस आयातीमध्ये 13 टक्के वाटा अजूनही आहे. त्यामुळे जर रशियाने हा निर्णय अंतिम केला तर युरोपच्या अडचणी वाढू शकतात. 

युरोपचा गॅस पुरवठा थांबवण्याचे संकेत 

पुतीन यांनी रशिया युरोपियन बाजारपेठेला होणारा गॅस पुरवठा आता थांबवू शकतो आणि त्याऐवजी इतर अधिक आशादायक व फायदेशीर बाजारपेठांकडे वळू शकतो, असे म्हटलं आहे. रशियन सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पुतीन म्हणाले की, आता इतर बाजारपेठा खुल्या होत आहेत. त्यामुळे आत्ताच युरोपियन बाजारपेठेला गॅस पुरवठा थांबवणे आणि नवीन बाजारपेठांमध्ये जाऊन स्वतःला प्रस्थापित करणे आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल. पुतीन यांनी हेही स्पष्ट केले की, हा अद्याप कोणताही अंतिम निर्णय नाही, तर हा केवळ 'मोठ्याने केलेला विचार' आहे. मात्र, त्यांनी सरकार आणि रशियन कंपन्यांना या विषयावर एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना नक्कीच देणार असल्याचे सांगितले आहे.

Continues below advertisement

युरोपियन युनियनचा तेलावरील बंदीचा निर्णय

हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा युरोपियन कमिशन 15 एप्रिल रोजी (हंगेरीच्या निवडणुकांनंतर) रशियन तेलाच्या आयातीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा कायदेशीर प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे. 2022 च्या युक्रेन युद्धानंतर रशियाकडून युरोपला जाणारा इंधन पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. तरीही रशिया अद्यापही सर्बिया, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या युरोपीय देशांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवतो. याशिवाय 'नोवाटेक'च्या नेतृत्वाखालील यामल एलएनजी (Yamal LNG) प्लांटमधूनही इंधन पुरवले जाते. रशिया हा नेहमीच एक 'विश्वसनीय ऊर्जा पुरवठादार' राहिला आहे आणि जे देश स्वतः विश्वासू भागीदार आहेत (उदा. स्लोव्हाकिया आणि हंगेरी), त्यांच्यासोबत रशिया यापुढेही नेहमीप्रमाणे व्यापार सुरूच ठेवेल, असा पुनरुच्चार पुतीन यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या